इंटरकनेक्शन By आकाश आलुगडे

    गेले अनेक वर्ष झाले मी व्यवसायात आहे.  माझा जुना व्यवसाय जो होता तो व्यवसाय नोंदणी / CSC सेंटरचा होता. त्यात मी पूर्ण महाराष्ट्रभर ग्राहक केले, मला कधीच व्हाट्सअप्प स्टेटसवर , सोशल मीडियावर माझ्या व्यवसायाची जाहिरात लावावी लागली नाही किंवा कामे मागावे लागले नाही. व्यवसायात माझं सर्वात महत्त्वाच कौशल्य होत ते म्हणजे 'ग्राहकांना अति उत्कृष्ट सेवा देणे', त्यामुळे माझ्या ग्राहकांनी मला खूप रेफरन्स दिले, माझी मार्केटिंग त्यांनीच केली. माऊथ पब्लिसिटीनेच मी चांगली कामे केली आणि भरपूर माणसे जोडली. आकाश आलुगडे काय काम करतो ?? हे मला कोणालाही सांगायची वेळ आतापर्यंत आली नव्हती. पण झालं असं.. की, गेल्या 2 वर्षात मी अनेक बिझनेसस /उद्योग सुरू झाले - केले. अनेक व्यवसाय मी वाढवले, काही बंद केले. व्यवसायात ग्राहक मुबलक असल्याने काम चांगलं सुरू होतं. हा एक मुद्दा झाला. 

दुसरा विषय कामाव्यतिरिक्त असा आहे की, मी अनेक बाबतीत अनेक क्षेत्रात, अनेक ठिकाणी योगदान देत असतो. जसे की मी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध लेखक होतो. अनेक मॅगझीन आणि पेपर्सला लेख छापले जायचे. "मृत्यूनंतर शरीराची विल्हेवाट" (Disposition of human Remains) यावरील मी संशोधन करत होतो. त्यावरील लेख खूप प्रसिद्ध झाले. तिथून माझे चाहते पासून वाचक वर्ग मोठा उभा झाला. तसेच अनेक संस्था, वाचनालय, ट्रस्ट, समिती, सोसायटी, आणि कमिटी येथे माझं योगदान आहे. Numistatic Society पासून वाचन कट्टे मी सुरू केलेत. नाणी नोटा संग्रहक, वाचक आणि एक विचित्र माणूस म्हणून मला बघितलं गेलं..


 माझे काम आणि माझ्या सर्व क्षेत्रातील लोकांना मी तिथल्या तिथे ठेवलं. कधी कोणाला इंटरफेस किंवा इंटरकनेक्शन करून दिले नाही. सध्या माझे सर्व उद्योग/व्यवसाय मी KNP Business Group या एका नावाखाली घेतले आहेत.

एक आठवड्यापूर्वी एक घटना घडली ती मी तुम्हाला सांगतो, 

माझे एक खूप जुने Consultancy व्यवसायातील ग्राहक मला कॉल केले आणि बोलू लागले - " आकाश तू सॉफ्टवेअर करतोस ?? हो सर.. खूप आधीपासून...

ते - तू मूर्ख आहेस का ?

मी - "नाही..🤔 काय झालं सर...?""मला सांगा माझं हे काम तुम्हाला कोणी सांगितलं"... ?

"अरे मी Ai ला विचारलं की आपल्या भागात कोण सॉफ्टवेअर करून देत ?? तर गुगल Ai ने एक कंपनीच नाव सुचवलं.. तिथला नंबर मी कॉपी केला, डायलपॅड वर घेतला आणि तुझं नाव दिसलं... माझ्या मनात विचार आला की आकाशचा आणि या कामाचा काय संबंध असेल ?? मला वाटलं चुकून कॉपी झाला असेल नंबर... तू कुठे आहेस आता ?? 

मी - "सर मी चहा पितोय D मार्ट जवळ..."

बर कुठे येऊ मी ?? 

मी - "ऑफिस वर या तुम्हाला ते जवळ पडेल मी 15 min पोहचतो..."

त्यांनी आल्यावर KNP चे बिझनेसस बघितले अगदी आमची 'इ कॉमर्स' विगो क्राफ्ट कम्पनी आहे, Antique शॉप आहे, सॉफ्टवेअर आणि Ai ची Avonik कम्पनी आहे सांगितलं. 

त्यांनी सांगितलं "तू व्यवसायात इतका छान होतास माहीत होतं.. जर तुझे हे व्यवसाय आहेत हे माहीत असते तर लाखो रुपयांची कामे मी दुसऱ्याला दिली.. ते ही त्याने नीट केली नाहीत.,"

मला तुझा राग आला होता कारण तू तुझ्या जवळच्या आणि खास लोकांना सुद्धा काय करतोस हे सांगितलं नाहीयेस ?? तुला कित्येक कामे मी दिली असती.. ( Aura आणि इंटेन्शन क्लिअर ठेवा अशी लोकं खूप भेटतील )

जसे जसे ते बोलत होते तसे तसे मला जाणवत होतं की मी भयानक मोठी चूक केली आहे ..! जी की... मी काय काम करतो ?? माझे कोणते व्यवसाय / कामे असतात ? फक्त त्यांनाच नाही तर माझ्या कोणत्याच क्षेत्रात मी माझ्या बिझनेसचं बोललो नाही. "इंटरकनेक्शन" कधीच येऊ दिले नाही..

  हे माझं एक तत्व होत की त्या - त्या क्षेत्रातील व्यक्तींशी तस तस वागावं.. पण मला या तत्वामुळे मोठं' नुकसान झालं आहे. इतकं की मी अजून 4 ते 5 वर्ष पुढे असतो. माझे कन्सल्टन्सीचे कमीत कमी 500 ग्राहक होते ते सर्व व्यवसायिक ग्राहक होते... मी ते गमावले त्यातील 25 भर सोडला तर मी कोणालाच काहीच सांगितलं नाही. जे बी Antique व्यवसायात तर एवढे ग्राहक 3 महिन्यात झाले, JB चे पार्सल 5 राज्यात गेले 2 देशात नाणी नोटा पाठवल्या साधारण 150 पेक्षा जास्त देशातील करन्सीची विक्री 3 महिन्यात केली. हे करत असताना मी KNP काय आहे माझे व्हिजन आणि ध्येय विसरून काम करत होतो. इंटरकनेक्शन तर खूपच लांब..

 आता थोडं मला सुपर अल्ट्रा हायली ऍक्टिव्ह मोड ऑन करून पळायला हवं तरच कुठे KNP बिझनेस ग्रुप मोठा होईल.. आणि माझी टीम अजून स्ट्रॉंग होईल. आता मला पुढे यावे लागेल, फ्रंटची ताकत वाढवायला हवी..

आता इंटरकनेक्शन करायलाच हव.....

हा इंटरकनेक्शनचा पहिला भाग आहे. माझ्या आयुष्यात अश्या अनेक कनेक्टिव्हिटी झाल्या आहेत... होत असतात. इथून पुढे पुन्हा 3 वर्षाने मी माझी लेखणी हातात घेतली आहे. येणाऱ्या काही दिवसात मी माझे लेख मालिका अजून वाढवेन तूर्तास एवढंच.....



KNP Ventures

इंटरकनेक्शन करायला हवं - 

9 ऑगस्ट 2026 

आकाश आलुगडे 

KNP Business Group

इचलकरंजी



इंटरकनेक्शन By आकाश आलुगडे 








Comments